महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना..
Monday, January 29, 2007

आपला फोटो वापरू नये ,' असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बजावले आहे. नव्या पक्षाच्या व्यासपीठावर राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे छायाचित्र असेल. शिवसेनेच्या स्थापनेच्या मेळाव्यास प्रबोधनकार उपस्थित होते , आता त्यांचे स्मरण करून राज नव्या पक्षाची स्थापना करीत आहेत.
पक्षाच्या ध्येयधोरणात टोकाचा मुस्लिम-विरोध नसेल , त्यांचा अनुनयही नसेल. ; दलितांबद्दल आपुलकीची भावना असेल. त्यामुळे पक्षाच्या झेंड्याला निळी अथवा हिरवी किनार असू शकते. महाराष्ट्राची अस्मिता हे राज यांच्या नव्या पक्षाचे सूत्र असेल. सर्व स्तरांतील जनतेचे कल्याण हा पक्षाचा हेतू असेल. धर्मजातिआधारित कोणताही भेदभाव पक्षात नसेल. कोणतीही खोटी आश्वासने द्यायची नाहीत , शिवसेना फोडण्यात रस दाखवायचा नाही , असे धोरण असेल. लोकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघणारा प्रामाणिक नेता , अशी प्रतिमा राज यांना निर्माण करायची आहे. नेत्याचे घर आणि पक्ष कार्यालय वेगळे राहील , याची दक्षता घेतली जाईल. आलेल्या प्रत्येकाला राज स्वत: भेटण्याचा प्रयत्न करतील.

राज यांच्यात लोक शिवसेनाप्रमुखांना बघतात याची जाणीव त्यांच्या समर्थकांना आहे. विशेषत: तरुणांची गर्दी राज यांना पाहायला जमते. ' नंबर वन क्राउडपुलर ' हे स्थान त्यांना कायम टिकवायचे आहे. नवा पक्ष म्हणजे विद्यार्थी सेनेचे नवे रूप नव्हे , याची जाणीव त्यांनी समर्थकांना करून दिली आहे. आपल्याबरोबर आलेल्या कार्यर्कत्याला पश्चात्तापाची पाळी येणार नाही. त्यांच्या आई-वडिलांना आपला मुलगा फुकट गेला , असे वाटणार नाही याची काळजी घेतली जाईल , असा शब्द राज यांनी दिला आहे. पक्षात कम्युनिस्टांप्रमाणे पॉलिट ब्युरो नसेल.

बाळा नांदगावकर , शिशिर शिंदे , दीपक पायगुडे , प्रवीण दरेकर , राजन शिरोडकर , अतुल सरपोतदार , केदार हुंबाळकर , संजय चित्रे , संजय घाडी , शिरीष पारकर अशा अनेक लढाऊ सहकाऱ्यांची टीम त्यांना लाभली आहे. 19 मार्चला शिवाजी पार्कवर नव्या पक्षाच्या पहिल्या मेळाव्यानिमित्त विराट शक्तिप्रदर्शनाची तयारी चालू आहे.
 
posted by Rohit at 3:07 AM | Permalink |


0 Comments: