बाळासाहेब माझे देव... राज ठाकरे
Tuesday, February 20, 2007
'' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे देव आहेत , देव आणि भक्त असे आमचे नाते आहे , प्रामाणिक भक्त कोण हे देवाला चांगले कळते ,'' अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज म्हणाले , '' बाळासाहेब आणि मी आमच्या दोघांच्या हृदयात परस्परांबद्दल आपुलकी असणारा एक कप्पा आहे. हृदयशून्य माणसाला तो कसा कळणार ? आमचे परस्परांशी फोनवर अनेकदा बोलणे होते. आठवडाभरापूवीर्च आमचे बोलणे झाले. मात्र , आम्ही राजकारणावर कधीच बोलत नाही. वैयक्तिक बोलतो , परस्परांची चौकशी करतो. '' बाळासाहेब मनापासून बोलतात. तीच भावना शिवसैनिकांमध्ये आहे ,'' असे राज म्हणाले. '' शिवसेनेत परत जाण्यासाठी मी दरवाजा ठोकलेला नाही. ते (उद्धव) स्वत:च माझ्याबद्दल बोलत आहेत. शिवसेनाप्रमुख , शिवसेना किंवा शिवसैनिक यांच्याशी आपले भांडण नाही. वाद आहे शिवसेना चालवत असलेल्या चार टाळक्यांशी ,'' असे राज यांनी ठणकावून सांगितले. महापालिका निवडणुकीत ' दूध का दूध आणि पानी का पानी ' असा निर्णय देऊन राज यांना मतदारांनी जागा दाखवली , अशी टीका उद्धव यांनी केली आहे. यावर राज म्हणाले , बरोबरच आहे. म्हणूनच मुंबईत शिवसेनेच्या २१ जागा कमी झाल्या. स्वत: बाळासाहेबांना घराबाहेर पडून मते मागावी लागली , यातच दूध कोणते आणि पाणी कोणते ते स्पष्ट झाले. हिंदुत्व मान्य आहे का , या उद्धव यांच्या प्रश्नावर राज म्हणाले : अशा अटी घालायला तपश्चर्या लागते. त्याने विनाकारण आव आणू नये. हे सर्व मुद्दे बाळासाहेबांचे आहेत. मनसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का ? यावर राज म्हणाले , '' ते कसला संभ्रम निर्माण करणार ? नव्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भवितव्य काय ? या प्रश्नावर त्याच मुलाखतीत शिवसेनाप्रमुखांनी , ' माहीत नाही ' असे उत्तर दिले होते. ते पुरेसे बोलके आहे. ''
 
posted by Rohit at 4:06 AM | Permalink | 0 comments
मनसे ठरवणार 'नाशिक कोणाचे'
Monday, February 5, 2007
प्रस्थापितांना धक्के देत आणि सत्ताधाऱ्यांना नाकारत नाशिककरांनी महानगरपालिका निवडणुकीत दिलेला कौल शुक्रवारी स्पष्ट झाला असून, जनतेने एकूण १०८ जागांपैकी युतीच्या पारड्यात ४० आणि दोन्ही काँग्रेसना मिळून ३८ जागा दिल्या आहेत. युतीच्या २० जागा घटल्याने त्यांच्या हातून निसटलेली सत्ता दोन्ही काँग्रेसला एकत्र येऊनही बहुमताअभावी पटकावता आलेली नाही. त्यामुळे १२ जागांवर मुसंडी मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात नाशिकच्या सत्तेच्या दोऱ्या गेल्या आहेत. शिवाय अपक्षांनी दहा आणि इतर छोट्या पक्षांनी आठ जागा पटकावल्याने त्यांनाही चांगलाच 'भाव' राहणार आहे.

मागच्या पंचवाषिर्क निवडणुकीत १०८ पैकी ५५ जागा मिळवून निविर्वाद बहुमत मिळवणाऱ्या युतीला यावेळी सत्ता राखता आली नाही. गेल्या तीन पंचवाषिर्कपासून जोरदार गरुडभरारी घेत मागच्यावेळी ३८ जागा पटकावून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यासोबत भाजपाच्या पदरातही २२ जागा पडल्या होत्या. निवडणुकीआधी नाशिकच्या महापौरपदी भाजपाचेच बाळासाहेब सानप होते. मात्र, त्याचा काहीही फायदा भाजपाला झालेला दिसला नाही. भाजपाला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले.

जागावाटपावरून दोन्ही काँग्रेस परस्परांच्यासमोर उभ्या ठाकल्याने त्यांना युतीच्या पडझडीचा फायदा मिळवता आला नाही. काँग्रेसला कमी लेखत स्वबळावर लढण्यासाठी जहाल भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना स्वत:चाच पराभव पहावा लागला. एकंदरीतच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार हवा असल्याचे चित्र होते. सभागृहातला सर्वात मोठा पक्ष म्हणून राकाँ पुढे तर येईलच, पण वेळप्रसंगी कुणाचीही मदत न घेता सत्ता काबीज करेल, असा होरा सगळीकडूनच व्यक्त होत होता. मात्र, मतदारांनी तो साफ चुकवला आणि राकाँचे संख्याबळ २३वरून १७वर आणून आदळले. दुसरीकडे मात्र काँग्रेस हा आहे त्यापेक्षा चार जागा अधिक मिळवणारा एकमेव पक्ष ठरला. गेल्या निवडणुकीत १७ वर अडलेली काँग्रेसची गाडी यंदा २१वर येऊन थांबली.

राज ठाकरे यांना कायमच साथ देणाऱ्या नाशिकने याही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार प्रतिसाद दिला. अवघ्या एक वर्षाच्या या पक्षाने पहिल्याच लढतीत थेट १२ जागा पटकावून खाते उघडले. या संख्याबळामुळे मनसेच्या हाती सत्तेच्या दोऱ्या आलेल्या आहेत. याशिवाय मनसेचे पाच ते सात उमेदवार अगदी कमी फरकाने पराभूत झाले आहेत. तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यात अग्रेसर असलेल्या डॉ. डि. एल. कराड यांच्या माकपला मतदारांनी सभागृहातून हद्दपार केले आहे. या पक्षांच्या दोन्ही नगरसेवकांना नवख्या उमेदवारांकडून पराभूत व्हावे लागले आहे.

दोन्ही काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती आणि मनसे यांच्यातील मतविभागणीचा फायदा उठवत फुटकळ पक्ष आणि अपक्षांनी आपापल्या सत्तेची गणिते साधून घेतली. बसपाने नाशिक महानगरपालिकेत पहिल्यांदाच तीन नगरसेवक घेऊन शिरकाव केला आहे. तर 'लोकजनशक्ती' पक्षाने राज्यातील पहिली व एकमेव जागा जिंकून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. गेल्या निवडणुकीत राकाँच्या चिन्हावर नगरसेवकपद मिळवलेल्या रिपाइंच्या दोघांनी यावेळी स्वतंत्रपणे जागा जिंकून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. समाजवादी पाटीर्, शेकाप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकत हजेरी लावली आहे. तर १० अपक्षांनी विजय मिळवत स्वत:ला सिद्ध केले आहे.
 
posted by Rohit at 9:12 AM | Permalink | 0 comments
मनसेकडे धाडले चचेर्चे खलिते
मतदारांनी सर्वच प्रमुख पक्षांना अर्धवट संख्याबळ प्रदान करत नाशिक महापालिकेच्या सत्तेचा अंकुश मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सोपवल्याने आगामी भूमिका ठरवण्यासाठी खुद्द राज ठाकरे रविवारी रात्री नाशिकमुक्कामी दाखल झाले. नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्याबरोबरच राज हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मनसेची पुढची चाल ठरवतील.

राज यांनी नाशिकशी निर्माण केलेल्या संबंधांची बूज मतदारांनी मनसेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा देऊन राखली आहे. 'फक्त एक संधी द्या. नालायक ठरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही', या निवडणुकीपूवीर् राज्यभर घेतलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार राज यांनी नाशिकमध्ये प्रचारादरम्यान केला होता. नाशिककरांनी राज यांच्या पक्षाकडे सत्ता नसली तरी सत्तेची सूत्रे मात्र सोपवली आहेत. त्यामुळे त्यांनी आता घेतलेल्या भूमिकेवर पुढच्या पाच वर्षांच्या कारभाराचे भवितव्य ठरणार आहे. नाशिककरांनी राज यांच्याकडे सोपवलेली भूमिका त्यांना मोठ्या नैपुण्याने वठवावी लागणार आहे.

नाशिक महापालिकेत दोन्ही काँग्रेस मिळून ३८ तर युतीकडे ४० संख्याबळ आहे. त्याखालोखाल १२ जागांचा पक्ष मनसे हाच आहे. त्यामुळे उरलेल्या पाच पक्षांची आणि दहा अपक्षांची मोट बांधण्यापेक्षा काँग्रेस आघाडी किंवा युती यांना मनसेची एकगठ्ठा १२ मते खुणावत आहेत.

सत्तेसाठी भाजप हा शिवसेनेशी युती तोडणार नाही आणि मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, ही बाब गृहित धरूनच काँग्रेस आघाडी मनसेशी सूत जुळवून सत्ता हस्तगत करेल असे दिसते. त्यादृष्टीने काँग्रेस आघाडी आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचे खलिते धाडण्यात आले आहेत. त्याचसोबत काँग्रेसने 'महापौर आमचाच' असा पवित्रा जाहीर करून टाकला आहे. पक्षाची पहिलीच निवडणूक असून, मिळालेल्या यशामुळे मनसेची राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत होण्याची शक्यता आहे. असे झाले तर पालिकेतील सर्व सत्तास्थाने आणि पाठिंब्याच्या बदल्यात हा पक्ष महापौरपदावर दावा सांगू शकतो. तसेच काही अपक्ष, छोट्या पक्षांना स्वत:कडे वळवून दबावगटाचे तंत्रही अवलंबू शकतो.
 
posted by Rohit at 9:02 AM | Permalink | 0 comments
भाजपलाही मनसेने मागे टाकले...
ठाण्यात आम्ही राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपपेक्षाही अधिक मते मिळवली. आमची कोणाशी युती नव्हती. समोर चार मोठे पक्ष असताना पहिल्याच प्रयत्नात ठाणेकरांनी आमचे तीन उमेदवार निवडून दिले. इतर वॉर्डातही मतदारांनी चांगला विश्वास दाखवला. त्यामुळे या निकालांबाबत मी समाधानी आहे. ठाणेकरांना शब्द दिल्याप्रमाणे १५ दिवसांतले दोन-तीन दिवस ठाण्यात येऊन मी स्वत: इथल्या प्रश्नांकडे लक्ष देणार आहे, अशी ग्वाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. मटाला दिलेल्या खास मुलाखतीत ठाण्यातील मनसेच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

युती ठाण्यात सत्तेच्या जवळ असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही इतर पक्षांना बरोबर घेऊन बहुमताचे गणित जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेची साथ मिळाल्याशिवाय हे गणित पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मनसे आघाडीबरोबर जाईल का, मनसेचे नगरसेवक वेगळे अस्तित्व कसे सिद्ध करतील, राज स्वत: ठाण्यासाठी किती वेळ देणार आहेत, ठाण्यात पक्षाच्या वाढीसाठी काय प्रयत्न होणार, या साऱ्या प्रश्ानंना राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

ठाण्यात कोणाबरोबर जायचे याचा विचार मी आता केलेला नाही. कोणाशीही माझे बोलणे झालेले नाही. सध्या पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. ठाण्याची सत्ता दिलीत तर १५ दिवसांतले दोन दिवस मी ठाण्यात थांबून विकासावर लक्ष ठेवेन, असे मी सांगत होतो. हे केवळ निवडणुकीत बोलण्यापुरते नव्हते. सत्तेत आलो नसलो तरी ठाणेकरांनी जो विश्वास दाखवला तो खरा करण्यासाठी ठाण्यावर मी अधिक लक्ष देणार आहे. त्याची सुरुवातही मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केल्याचे राज म्हणाले.

मनसेचे नगरसेवक वेगळेपण कसे दाखवतील, या प्रश्ानवर लवकरच विजयी उमेदवारांची बैठक होत असून त्यात या सर्व गोष्टींवर चर्चा होईल, असे राज यांनी सांगितले. निवडणुकीतून घराघरात पोहोचलेले उमेदवार यापुढेही काम सुरू ठेवतील. आपल्या कामातून लोकांचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ करणे हाच आमचा अजेंडा असेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक यासह इतर महापालिकांमधील कामांचा आराखडा आणि पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी दौरेही सुरू केले आहेत. रविवारीचे ते नाशिकला रवाना झाले.
 
posted by Rohit at 9:02 AM | Permalink | 0 comments
माझा शब्द.... राज साहेब
Saturday, February 3, 2007





Thanx to Anuja Shinde
 
posted by Rohit at 6:36 PM | Permalink | 0 comments
एकूण निकाल : एक नजर
Friday, February 2, 2007
नाशिक
शिवसेना : २६
भारतीय जनता पक्ष : १४
काँग्रेस : २१
राष्ट्रवादी काँग्रेस : १७
मनसे : १२
बसपा : ३
आरपीआय : २
समाजवादी पार्टी : १
लोकजनशक्ती पार्टी : १
माकप : २
शेकाप : १
अपक्ष : ५

ठाणे
शिवसेना : ४८
भाजप : ५
कॉंग्रेस : १६
राष्ट्रवादी : २५
मनसे : ३
सपा : ५
बसप : २
शिवराज्य पक्ष : १
अन्य : ११

एकूण : ११६

पिंपरी-चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस : ६०
काँग्रेस :२०
भाजप : ९
शिवसेना : ४
आरपीआय : १
मनसे : 0
इतर : ११


पुणे
राष्ट्रवादी कॉंग्रेस : ४२
कॉंग्रेस : ३५
भाजप : २५
शिवसेना : २०
मनसे : ८
अन्य : १४
एकूण जागा : १४४

उल्हासनगर
गंगाजल फ्रंट , लोकभारती -१४
शिवसेना - १६
भाजप -११
राष्ट्रवादी- १५
कॉंग्रेस -५
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - २
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) - ५
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (गवळी) -१
अपक्ष -६
 
posted by Rohit at 5:46 AM | Permalink | 2 comments
पुण्यात त्रिशंकू स्थिती, कॉंग्रेसची पिछेहाट
पुणे महापालिकेत कॉंग्रेसची जबरदस्त पिछेहाट झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने 42 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. शिवसेना भाजप युतीला 45 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आठ जागा मिळाल्या आहेत.

पक्षनिहाय स्थिती अशी -
एकूण जागा - 144
जाहीर निकाल - 144
कॉंग्रस - 35
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 42
भाजप - 25
शिवसेना- 20
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 08
अपक्ष- 14
 
posted by Rohit at 5:45 AM | Permalink | 0 comments
"मनसे'ने खाते उघडले

शिवसेनेतून बंडखोरी करून राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीत नाशिकमधूनच पहिले खाते उघडले. जेल रोड परिसरातील वॉर्ड क्रमांक ३५ मधून सुनंदा काशीनाथ खरोटे १३४८ मते मिळवून विजयी झाल्या. पालिका निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात "मनसे'ला खाते उघडता आले नव्हते. भगूर पालिका निवडणुकीत "मनसे'च्या उमेदवाराचा केवळ एका मताने पराभव झाला होता. त्याच परिसरातून महापालिका निवडणुकीत "मनसे'ला खाते उघडण्याची संधी मिळाली. "मनसे'च्या पारड्यात गेलेला हा पहिला विजय ठरला.
 
posted by Rohit at 5:44 AM | Permalink | 0 comments
नाशिकमध्ये मनसेने १२ जागा जिंकून महापालिकेत अस्तित्व सिध्द केले-१०८ जागांचे निकाल
नाशिक महानगपालिकेतील १०८ जांगांचे निकाल याप्रमाणे-
२१कॉंग्रेसला तर राष्ट्रवादीला १७ जागा मिळाल्या .भाजपाला १४,शिवसेनेला २६ आणि १२ जागा मनसेकडे गेल्या आहेत. रिप.(आठवले)२,लोकजनशक्ती १,बी एस पी ३,समाजवादी पक्ष १, शेतकरी कामगार पक्षाला १ तर १० जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
 
posted by Rohit at 5:43 AM | Permalink | 0 comments