राज ठाकरेंच्या सभेचे घरोघरी आवताण...
Monday, January 29, 2007
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या पहिल्या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे यांचे अनुयायी मोठे शक्तिप्रदर्शन घडवण्यासाठी गेला आठवडाभर अहोरात्र परिश्रम करत आहेत. मुंबईप्रमाणेच राज्यातील सर्व लहान मोठ्या शहरांत आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी राज यांची पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि कटआऊटस झळकताना दिसत आहेत. 'राज यांच्या सभेला आवर्जून यावे' अशी विनंती करणारी 'आवताणं' हजारोंच्या संख्येने घरोघरी वाटण्यात येत आहेत.

राज ठाकरे हे तरुणांची सर्वाधिक गदीर् खेचणारे आणि राज्यातील सर्वाधिक करिष्मा असणारे व्यक्तिमत्त्व आहे, हे रविवारच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दाखवून द्यायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी याच मैदानावर जमलेलेल्या गदीर्चे रेकॉर्ड मोडले जाईल, अशा जिद्दीने या सभेची तयारी सुरू आहे. राज यांचे खंदे समर्थक प्रवीण दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दादर भागात रविवारच्या सभेचे निमंत्रण करणाऱ्या हजारो आमंत्रणांचे घरोघरी वाटप केले. 'सह्यादी थरारून उठला, दऱ्या खोऱ्यातून प्रतिध्वनी उमटला, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, रपेट संपली, खलबते संपली, , आता निर्धार शिवतीर्थावर एकजूट दाखविण्याचा, मुहूर्त ठरला... रविवार फाल्गुन कृष्ण पक्ष चतुथीर् श्री शालिवाहन शके 1927, फिरंगी दिनांक 19 मार्च 2006' असे या आमंत्रणात म्हटले आहे. 'वाजत गाजत, गुलाल उधळत, नव महाराष्ट्राचा जल्लोष करत, तरुणाईच्या उमेदीने, पण हां, शिस्तीने या', असे आवाहनही आमंत्रणात आहे.

' अब राज हमारा है, होय, हे बंड आहे, राजकारणातील ढोंगाविरुद्ध - महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अन्यायाविरुध्द- तरुणांच्या शोषणाविरुध्द, अशा घोषणा ठिकठिकाणी होडिर्ंग्जवर दिसत आहेत. राज यांची आक्रमक व करारी मुदा गदीर्त उभी आहे किंवा राज यांच्या डोळ्यावरील गॉगलमधे समोर पसरलेल्या गदीर्चे प्रतिबिंब दिसते आहे, अशी होडिर्ंग्ज मुंबईच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर व नाक्या-नाक्यावर लावली आहेत.

मुलुंड परिसरात शिशिर शिंदे यांनी राज यांची अनेक भव्य कटआऊटस लावली आहेत. वेगवेगळ्या होडिर्ंग्जवर 'रंग लावू नवा, विचार रूजवू नवा, महाराष्ट्र घडवू नवा.. चलो शिवाजी पार्क' अशा घोषणा आहेत. वांदे ते दहिसर दरम्यानही खांबाखाबांवर शशिकांत जगदाळे व जयेंद कुमार यांच्या पुढाकाराने राज यांची पोस्टर्स झळकत आहेत.
 
posted by Rohit at 3:10 AM | Permalink |


0 Comments: