महाराष्ट्र निर्माण सेनेचेही ठाणे जिल्ह्यावर लक्ष
Monday, January 29, 2007
वाढलेली आमदार संख्या आणि वर्षभराच्या अवधीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणूका यामुळे ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला जसा आत्मियतेचा वाटू लागला आहे, तसाच तो राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही वाटतो आहे. म्हणूनच रविवार, 19 मार्चला शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात लाखभर नवीन सैनिक ठाण्यातून नेण्याची तयारी करण्यात आली आहे.

ठाणे शहरातून राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची पहिली संधी साधणारे कोपरीतील रवींद मोरे यांच्यासह भारतीय विद्याथीर् सेनेचे माजी अध्यक्ष अविनाश पवार, राजन गावंड, किरण ऐगडे या तरुण मंडळींनी राज ठाकरे यांच्या मागे तरुण कार्यर्कत्यांची नवीन फौज उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीस वंदन करून केली होती. त्या दिवशी विश्रामगृहावर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या कार्यर्कत्यांची संख्या मोठी होती.

नऊ तारखेला पक्ष स्थापनेची घोषणा झाल्यानंतरराज ठाकरे यांचे निकटवतीर्य शिरीष पारकर यांनी ठाणे व नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यप्रणालीबाबत सविस्तर माहिती देऊन कार्यकतेर् बांधण्यासाठी या दौऱ्यामुळे मदत झाली. पक्षाची अधिकृत घोषणा होण्यापूवीर्च नवी मुंबई आणि विक्रमगड येथे राज समर्थकांनी जनसंपर्क कार्यालये सुरू केली होती. 12 मार्च रोजी ठाण्यात वैतीवाडी भागात नवनिर्माण सेनेचे कार्यालय स्थापन झाले. विरार येथील जाहीर मेळाव्यात ख्ाश्चिन तसेच मुसलमानांची लक्षणीय उपस्थिती, कौपरखैरणेच्या मेळाव्या माथाडी कामगारांची उपस्थिती ही बदलत्या राजकीय परिणामांचे द्योतक असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.

भारतीय विद्याथीर् सेनेतून राज ठाकरे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या कार्यर्कत्यासोबत नवीन तरुणांनाही जोडण्याची मोहिम ठाणे शहरातील राज ठाकरे यांच्या पहिल्या प्रवासापासूनच सुरू झाली होती. ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत मोठे यश नाही मिळाले तरी मोक्याच्या जागांवर माणसे उभी करून नुकसान करण्याएवढी शक्ती नवीन पक्षाने गोळा केली आहे. शहापूर हा तर नवीन पक्षाचा बालेकिल्ला म्हणूनच उदयाला येण्याची शक्यता असून भविष्यात तेथून शिवसेनेचा आमदार निवडून आणणे कठीण होणार आहे. मुरबाड, कल्याण, डोंबिवली, वाडा, भिवंडी, नवी मुंबई येथेही पक्षाच्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. उल्हासनगरमध्ये संभाजी पाटील यांच्या प्रवेशामुळे तिकडच्या शिवसेनेला धक्का पोहोचला आहे.

राज ठाकरे यांच्या विश्रामगृहातील बैठकीपासून आतापर्यंतच्या काळात जो माहोल तयार झाला आहे ते पाहता सुमारे 70 ते 80 हजार नवीन सैनिक शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी जातील.
 
posted by Rohit at 3:18 AM | Permalink |


0 Comments: