सेक्युलर राज ठाकरे..
Monday, January 29, 2007
गुरुवारी मुस्लिम आणि शीख नेत्यांना समारंभपूर्वक भेटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सेक्युलर रंग अधिकच उजळून निघाला आहे. शुक्रवारी त्यांना दलित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भेटून गेले. शनिवारी उत्तर भारतीयांची गदीर् कृष्णभुवनवर होणार आहे.

मुंबईतली सर्वात मोठी मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बडी मशिदीच्या मौलवींसह भेंडीबाजार, कुर्ला, गोवंडीतील मुुस्लिमांनी शुक्रवारी दुपारी राज यांची निवासस्थानी भेट घेऊन 19 तलवारी भेट दिल्या. मुस्लिम म्हणून आमच्यावर सदैव अन्याय होत असल्याची भावना त्यांनी राज यांच्याकडे मांडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यामध्ये हिरव्या रंगाला स्थान दिल्यामुळे तुमच्या पक्षाविषयी आपुलकी निर्माण झाली आहे. शिवाजी पार्कच्या मेळाव्याला दहा हजार मुस्लिम उपस्थित राहतील, अशी ग्वाही मुस्लिम नेत्यांकडून राज यांना देण्यात आली. विशेष म्हणजे याप्रसंगी मुस्लिम नेत्यांशी बोलताना राज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राला विरोध दर्शवला. पण त्याचवेळी त्यांनी हिंदू देवदेवतांची विटंबना होताना मुस्लिमांनीही विरोध करावा, अशी भूमिका घेतली.

मुस्लिम आणि शीख नेत्यांच्या भेटीसाठी हाजी अरफाज शेख आणि बंटी म्हशीलकर यांनी पुढाकार घेतला होता. तर शुक्रवारी शिरीष पारकर यांच्या प्रयत्नाने ईशान्य मुंबईतील दलित नेत्यांची राज यांच्याशी भेट घडवून आणली. शनिवारी उत्तर भारतीय नेत्यांसोबतच काही ख्रिश्चन नेतेही राज यांना भेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या माहितीफलकांना पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्कत्यांनी स्वत:चे नवे माहितीफलक सुरू केले आहेत. अशाच दक्षिण मुंबईतील एका माहितीफलकाचे उद्घाटन अरविंद गावडे आणि परेश तेलंग यांनी केले.
 
posted by Rohit at 3:19 AM | Permalink |


1 Comments:


At February 28, 2008 at 5:01 AM, Blogger क्षण हा आपला

नमस्कार,
जय महाराष्ट्र.
आपण सेक्युलर राज ठाकरे असा उल्लेख करता आणि मुस्लीम,दलीत,ख्रिच्छन,असा जातीय उल्लेख ही करता असे का? आपल्या महाराष्ट्रात मराठी मुस्लीम ,ख्रिच्छन नाही आहेत का? सारा मराठी समाज एकच आहे .त्यामुळे कृपौया असे उल्लेख टाळावेत. दलीत मराठी हा कुठला नविन प्रकार तुम्ही शोधून काढलात आपण . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संपूर्ण मराठी समाज उतरला होता .
धन्यवाद.
आपला
विक्रम गायकवाड.