राजा, राजधर्म वोळखावा...
Monday, January 29, 2007
गर्दी जमवण्याचं एक तंत्र असतं. ते आपल्याला अवगत आहे, हे आपल्या सभांच्या फोटोंवरून दिसतं. पण जमलेली गर्दी टिकवण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरतंच, असं नव्हे. महाराष्ट्रात शरद जोशी, डॉ. दत्ता सामंत आदींच्या हजारोंच्या सभा झाल्या. पण पुढे काय झालं?

.......................................

प्रिय राज,

आज आपल्या राजकीय कारकिदीर्तला अत्यंत महत्त्वाचा दिवस. गेल्याच आठवड्यात आपण स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची आज पहिली जाहीर सभा होत असताना जनतेच्या, विशेषत: महाराष्ट्रातच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या मराठी समाजाच्या आपल्याकडून विशेष अपेक्षा आहेत. त्या आपल्या कानावर आल्या असतीलच. त्यांचं पुन्हा एकदा स्मरण करून देण्यासाठीच हा पत्रप्रपंच.

जाहीर स्वरूपाच्या वृत्तपत्रीय लिखाणात 'मी'चा उल्लेख टाळावा, असा संकेत आहे. पण तो दूर सारून इथे मी येतोच. याचं कारण चाळीस वर्षांपूवीर् आपल्याच काकांनी - श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला जाहीर मेळावा आयोजित केला, त्या वातावरणाचा दीर्घ पल्ल्याचा परिणाम माझ्या व माझ्यासारख्या पोरसवदा वयाच्या हजारो तरुणांवर झाला. त्यामुळेच चाळीस वर्षांनंतर आपल्या नव्या साहसाची पहिली परीक्षा होत असताना त्या मेळाव्याची तुलना मनातल्या मनात होणं अपरिहार्य आहे. ठाकरेंनी त्या मेळाव्यात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठीच्या लढाईचं रणशिंग फुंकलं. त्यावेळी त्यांचं जे वय होतं, त्याच वयोगटात आपण आज आहात. पण ही तुलना इथेच संपते. कारण बाळासाहेबांनी ही संघटना स्थापन करताना 'राजकारणाचं गजकर्ण नको', असं म्हणत टाळ्या मिळवल्या. पण दोनच वर्षांनी आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून तेच गजकर्ण स्वीकारलं. आपण तर राजकीय पक्ष म्हणूनच रिंगणात उतरलात. त्यामुळे राजकारण-विशेषत: निवडणुकांचं राजकारण-आपल्याला र्वज्य नाही, हे ओघानं आलंच. या राजकारणाच्या रिंगणात उतरून शड्डू ठोकायचे, तर आपला प्रतिस्पधीर् कोण, आणि त्याची शक्तिस्थानं कोणती, याचं नीट भान असावं लागतं. तसं आपल्याला आहे, याची जाणीव शिवाजी पार्कवर जमलेल्या आपल्या चाहत्यांना आणि उत्सुक जनतेला करून द्यावी लागेल.

संघटना म्हणून राजकारणात उतरणाऱ्यांना काही स्वातंत्र्यं असतात. ती शिवसेनेने उपभोगली. ठाकरेंनी आपल्या राजकीय चालींना सामाजिक आंदोलनांची डूब दिली व त्यात अनेकदा ते यशस्वीही ठरले. मराठीचा प्रश्ान् त्यांनी राजकीय खेळी म्हणून यशस्वीपणे राबवला आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला धामिर्क नव्हे, तर सांस्कृतिक किनार लावली. ही कसरत ठाकरे करत होते, म्हणूनच शिवसेना वाढत राहिली. आपण सेनेच्या नेतृत्त्वालाच आव्हान देऊन नवं घरकुल उभारलं असल्याने, आपली चालही वेगळी आहे, हे सिद्ध करावं लागेल. त्यात आपल्याला यश आलं, तर अवघड शिखरं सर करण्याचं बळ आपल्या पायांत आणि तशी धमक आपल्या उरात असल्याचं स्पष्ट होईल.

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर आपण महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात फिरलात. सर्वत्र आपले उत्स्फूर्त स्वागत झाले. आपल्या हातात कोणतीही मोठी संघटना नाही किंवा देण्यासारखं काहीही नाही. तरीही गावागावात लोक आपल्या स्वागतासाठी जमले. ही गदीर् आश्वासक आहे, तशीच आव्हानात्मकही. गदीर् जमवण्याचं एक तंत्र असतं. ते आपल्याला अवगत आहे, हे आपल्या सभांच्या फोटोंवरून दिसतं. पण जमलेली गदीर् टिकवण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरतंच, असं नव्हे. महाराष्ट्रात शरद जोशी, डॉ. दत्ता सामंत आदींच्या हजारोंच्या सभा झाल्या. पण पुढे काय झालं? डॉ. सामंतांची कामगार चळवळ मुंबईतही टिकली नाही आणि शरद जोशींना स्वत:ला संसदेत जाण्यासाठी शिवसेनेचा आधार घ्यावा लागला. हे असं घडलं याचं कारण गदीर्तला प्रत्येक जण स्टेजवरच्या प्रकाशझोतातल्या नेत्यामध्ये स्वत:चं भवितव्य पाहत असतो. ते हरवलं की त्याचा भ्रमनिरास होतो आणि त्याच्या मनातल्या मूतीर् आणि पुतळ्यांच्या बाहुल्या बनतात.

लोक अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान आणि माधुरी दीक्षितला पाहण्यासही गदीर् करतात. पण त्या गदीर्त आणि आपल्याला लाभलेल्या गदीर्त फरक आहे. लोक नटांना बघतात, तेव्हा त्यांना केवळ चेहरा पाहायचा असतो. नेत्यामध्ये ते स्वत:ला शोधत असतात. अशा वेळी नेत्याने आपल्यामध्ये जनतेच्या आशाआकांक्षांना स्थान आहे की नाही हे तपासायला हवं. ग्रामीण भागातल्या जनतेच्या आशांचं प्रतीक बनायचं, तर बाजरीची भाकरी आणि पिठल्याची चव मनापासून आवडायला हवी. जनतेसमोर मीठ-भाकरीबद्दल बोलायचं आणि नंतर पिझ्झा हाणायचा, असं वागणाऱ्या नेत्यांना काही काळ ग्लॅमर राहतं, पण ते बेगड अकाली उघडं पडतं आणि खेळ खल्लास होतो. 'न् द्यद्गड्डस्त्रद्गह्म द्बह्य द्मठ्ठश्ा2ठ्ठ ड्ढ4 ह्लद्धद्ग ष्श्ाद्वश्चड्डठ्ठ4 द्धद्ग द्मद्गद्गश्चह्य', असं म्हणतात. सुदैवाने शिवसेनेत फूट पाडून आपला इमला बांधण्याचा आपला डाव नाही. आपण आपली नवी टीम उभी करत आहात. या पवित्र्याचे फायदे आणि तोटेही आहेत. नव्या रक्ताला वाव मिळाल्याने महाराष्ट्रात खरंच नवनिर्माण होईल, अशी आशा अनेकजण बाळगून आहेत. पण नव्या रक्ताला कोणती चटक लागते, यावर बरंच काही अवलंबून आहे. गुजरातेत चिमणभाई पटेल यांच्या विरोधात तरूणांचं नवनिर्माण आंदोलन उभं राहिलं, त्यास जयप्रकाश नारायणांचा पाठिंबा व आशीर्वाद मिळाला. आसामात तरुणांनीच 'आसाम गण परिषद' उभारली. यातल्या तरुणांचं पुढे काय झालं? महाराष्ट्रात नवनिर्माण करायचं तर तुम्ही एकटे पुरेसे नाही. तुमच्या आसपास तशाच वृत्तीची फौज हवी. खाजगी बैठकीत ग्लासं भरून देणारे आणि तुमच्या प्रत्येक वाक्याला टाळी देणारे, मागणारे सोबती औट घटकेच्या करमणुकीसाठी ठीक, पण ते जनरल बनू शकत नाहीत. त्यासाठी वेगळी मानसिकता लागते. ती असणारे किती आहेत, त्याचा शोध घ्यावा लागेल.

प्रखर हिंदुत्त्वाच्या मुशीत आपण वाढलात आणि आपलं राजकारण बहरलं. वेगळी वाट चालताना या मूल्यांचं काय करणार? ती सोडायची, तर त्याच मुशीत वाढलेल्या आपल्या विद्याथीर् सेनेच्या कार्यर्कत्यांचं मन कसं वळवणार? शरद पवार, प्रमोद महाजन, नारायण राणे आदी आपल्या आसपास राजकारण करणाऱ्या अन्य पक्षांच्या नेत्यांपासून आपण किती अंतर ठेवणार? आणि विशेष म्हणजे शिवसेनेबरोबर आपला राजकीय व्यवहार कसा असणार? या सर्व प्रश्ानंची उत्तरं जाणून घेण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ती पहिल्याच सभेत मिळतील, अशी अपेक्षा नाही. पण विचारांची दिशा कळली, तर आपला प्रवास कोणत्या दिशेने आहे, याचा अंदाज येईल.

शंभू राजांना लिहिलेल्या एका पत्रात समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, 'राजा, राजधर्म वोळखावा। यत्ने अंगी बाणवावा। युक्ते अंमल करावा। राजकारणे।।' आपल्याकडूनही अशीच अपेक्षा बाळगता येईल?

शुभेच्छा!

- भारतकुमार राऊत
 
posted by Rohit at 3:21 AM | Permalink |


0 Comments: