शिवाजी पार्कवर आज खुलणार 'राज'
Monday, January 29, 2007

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवण्याची जिद्द आणि इच्छा बाळगत राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ' महाराष्ट्र नवनिर्माण सेने ' ची पहिलीवहिली सभा रविवारी शिवाजी पार्कावर होत आहे. ही सभा ' प्रचंड यशस्वी ' करण्यासाठी राज ठाकरे यांच्या खंद्या समर्थकांनी आणि कार्यर्कत्यांनी कंबर कसली आहे. सभेसाठी राज्यभरातून तब्बल दीड ते दोन लाखांची गर्दी होईल , असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे यांच्या करिष्म्यावर फिदा असलेल्या तरुण वर्गासह दलित , मुस्लिम वर्गातील तरुणांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती हे सभेचे वैशिष्ट्य राहील.

सर्वसामान्यांपासून ते राजकीय क्षेत्रात काही महिने पक्षाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या राज यांच्या सभेला कसा प्रतिसाद मिळेल , हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. शिवाजी पार्कावर सभा यशस्वी करून ' हम भी कुछ कम नहीं ' ची चुणूक देण्याच्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सगळी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे. सभेसाठी राज यांची प्रचंड आकारांची होडिर्ंग्ज , वैशिष्ट्यपूर्ण पोस्टर्स , बॅनर्स लक्षवेधक आहेत. सभेची जबाबदारी मनोज हाटे , राजन शिरोडकर , शिरीष पारकर , प्रवीण दरेकर , शरद सावंत , संजय घाडी आदींवर सोपवलेली आहे.

पक्षाची घोषणा अनोख्या पद्धतीने करणाऱ्या राज यांच्या सभेचे व्यासपीठ तुलनेने साधे असेल. सायंकाळी सहा-साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या सभेत सुरुवातीला शिशिर शिंदे , अतुल सरपोतदार , शिरीष पारकर , प्रवीण दरेकर , संजय चित्रे , संजय घाडी आदींची भाषणे झाल्यानंतर खुद्द राज यांचे भाषण होणार असल्याचे कळते.

झेंड्यातील निळा , हिरव्या रंगांच्या आकर्षणापोटी या सभेसाठी दलित समाजातील 25 हजार लोक येणार असून मुस्लिम समाजातील तरुणां-बरोबर महिलांची संख्याही मोठी असेल , असे कळते. रायगडमधून सात ते आठ , ठाण्यातून 30-40 , नाशिकमधून 15 , पुण्यातून 15-20 तर नगरमधून पाच-सात हजार कार्यकतेर् सभेसाठी अपेक्षित आहेत.

राज्यभरातून निव्वळ पाच ते सहा हजार गाड्या येणे अपेक्षित आहे. बसेस , रेल्वे , एसटी यांतून येणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे. केवळ मुंबईतूनच दोन ते अडीच हजार गाड्या येतील. यात उत्तर मुंबईतून 200 बसेस , तीस ट्रक , दहा टेम्पो तर कुर्ल्यातून दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली 113 बसेस येणार आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद गावडे 40 बसेस , 20 टेम्पो , शंभरएक मोटरसायकलींवरून सुमारे पाच हजार समर्थक घेऊन येतील. मीरा-भाईंदर , बेहरामबाग , भारतनगर आदी भागांतून हजारो कार्यकतेर् हाजी शेख घेऊन येणार आहेत. याशिवाय राज आणि त्यांचा नवा पक्ष या विषयावर विविध मान्यवरांचे लेख असणाऱ्या ' प्रवाह ' चा विशेषांकाचे या वेळी प्रकाशन होणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
 
posted by Rohit at 3:22 AM | Permalink |


0 Comments: