राज ठाकरे यांचे सहकारी कोण?
Monday, January 29, 2007
महाराष्ट्र निर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पक्षस्थापनेच्या अगोदरपासूनच सहकारी निष्ठावंतांची साथ लाभली आहे. सुरुवातीपासून आपल्याबरोबर आहेत त्यांना पक्षात मानाचे स्थान मिळेल, असा शब्द राज यांनी दिला आहे. पक्षाची स्थापना करताना आणि शिवाजी पार्कचा मेळाव्याच्या आयोजनात राज यांची पत्नी शमिर्ला यांची साथ व सहभाग मोलाचा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या मेळाव्यास व्यासपीठावर दीपक पायगुडे, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, राजन शिरोडकर, अतुल सरपोतदार, शिरीश पारकर, वसंत गीते, श्वेता परूळकर हे प्रमुख सहकारी उपस्थित होते. राज यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱ्या आणि बेंजो-बँडच्या तालावर बेधुंदपणे नाचणाऱ्या लक्षावधी तरुणांपुढे भाषणाची संधी मिळाली म्हणून पायगुडे, शिंदे, सरपोतदार, पारकर, दरेकर भारावून गेले.

पायगुडे दोन वेळा पुण्यातून आमदार म्हणून निवडून आले. गेल्यावेळी त्यांचा अवघा अडिचशे मतांनी पराभव झाला. राज यांचे ते खंदे समर्थक. निवडणुकीत संपर्कप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात काम केले. पुण्यात त्यांचे सार्वजनिक काम खूप आहे. मिलिटरी स्कूल सुरू केले. दरवषीर् सामूहिक विवाह आयोजित करतात. लोकसेवा सहकारी बँकेचे ते प्रमुख आहेत. दहा रुपयांत जेवण योजना त्यांनी सुरू केली.

शिंदेे माजी आमदार. शिवसेनेचे उपनेते होते. एक वेळ नगरसेवकही होते. लढाऊ-आक्रमक प्रतिमा. धारा तेल-पाम तेल आंदोलन, वानखेडे स्टेडियम खेळपट्टी उखडणारे आंदोलन त्यांनी घडवले. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने उभारली. साहित्य, कला, क्रिडा आदी सर्व क्षेत्रात चौफेर संपर्क. उद्धव की राज असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी राज यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मुलुंडमधील जॉगिंग ट्रॅक आणि दरवषीर् होणाऱ्या बाल मेळ्याचे शिल्पकार.

दरेकर विद्याथीर् सेनेत काम करणारा राज यांचा खंदा कार्यकर्ता. राजचे समर्थक म्हणून तीन वेळा महापालिकेचे आणि गेल्या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट सेनेने त्यांना नाकारले. मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, सहकार व लेबर क्षेत्रात त्यांचे काम आहे. कार्यर्कत्यांचा मोठा फौजफाटा आहे, उत्तम संघटक म्हणून नाव आहे.

शिरोडकर प्रशासकीय क्षमता असलेला राज यांचा विश्वासू सहकारी. शिवाजी पार्कवरील सभेच्या यशात त्यांचाही वाटा असल्याचे सांगितले जाते. कार्यक्रमाचे आयोजन, झेंडे, बिल्ले, स्टिकर्सच्या निमिर्तीत पुढाकार.

अतुल सरपोतदार हा शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचा पुत्र. उद्धव-राज संघर्षात त्यांनी सतत राजला साथ दिली. अतुल ोांनी राज यांच्यासमवेत राज्यभर दौरे केले. शिवसेनेचा नवी मुंबईचा संपर्कप्रमुख म्हणूनही काम केले. पारकर हॉटेल व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापकपदाचा अनुभव, इंग्रजीवर प्रभुत्व असलेले. विद्याथीर् सेनेत सरचिटणीस होते.

श्वेता परूळकर यांची स्वत:ची आदित्य व्हीडिओ कंपनी आहे. राज यांनी सेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यापासून नव्या पक्षाची घोषणा करेपर्यंतची दाखवण्यात येणारी 5 मिनिटांची फिल्म त्यांनी स्वत: केली आहे. राज यांच्या शिवसेनाप्रमुखांवरील फोटोबायोग्राफी पुस्तकाच्या निमिर्तीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. आमदार बाळा नांदगावकर हे पडद्यामागून काम करतात. यााखेरीज अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, केदार हुंबाळकर, राजू परूळेकर अशी मोठी फळी राज यांच्याबरोबर आहे.
 
posted by Rohit at 3:26 AM | Permalink |


0 Comments: