'सायलेंट व्होटर'च महत्त्वाचा-राज ठाकरे
Wednesday, January 31, 2007
जी मंडळी एरवी मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, ती माझ्या सभांना येत आहेत...

तुम्ही मुंबई-ठाण्यात सर्व जागांवर उमेदवार का उभे केले? इतके उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं?

ु राज ठाकरे : पक्षाच्या स्थापनेला एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि या निवडणुका आल्या. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार शहरांवर आम्ही लक्ष केंदित केलं आहे. सर्व जागांवर आम्ही विजयी होऊ, असा दावा आम्हीच काय, कोणताच पक्ष करू शकणार नाही. तसा करणं हास्यास्पद असतं. पण या शहरांच्या विविध भागांमध्ये आमची नेमकी ताकद किती आहे, हे तरी कळेल. त्या आधारे भविष्यात पक्षबांधणीही करता येईल.

. कोणत्याही पक्षाशी युती केली नाहीत, यामागचं कारण काय?

ु कोणाशी करणार युती वा आघाडी? सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मारामाऱ्या चालल्या असताना त्यात न पडण्याचं आम्ही ठरवलं. शिवाय युतीमध्ये पक्षाची ताकद किती हे कळतच नाही.

. तुमचे जवळपास सर्व उमेदवार मराठी आहेत. शिवसेनेचेही मराठीच उमेदवार. ते एकमेकांची मतं खातील आणि अमराठी उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, अशी चर्चा सुरू आहे..?

ु हा विचार शिवसेनेच्या नेत्यांनी मी त्या संघटनेत असताना करायला हवा होता. तेव्हा तो झाला असता, तर अशी भीती त्यांना राहिली नसती. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचेही बहुसंख्य उमेदवार मराठीच आहेत.

. मुंबई महापालिकेत कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल आणि तुमच्या पक्षाला सहा ते आठ जागा मिळतील, असा पोलिसांचा अंदाज आहे...

ु मी असल्या अंदाजांचा विचार करत नाही. एक तर त्यांनी कशाच्या आधारे निष्कर्ष काढले, हे माहीत नाही. शिवाय एक महिन्यापूवीर् केलेल्या पाहणीच्या आधारे हे निष्कर्ष काढले असतील, तर ते आता अर्थहीन आहेत. आम्हाला किती जागा मिळतील, हे तेच काय मीही सांगू शकत नाही आणि मी अंदाज बांधतही नाही. २ फेब्रुवारीला जे निकाल येतील, ते खरे. मुंबईतील २२७ पैकी १४५ जागांवर आम्ही लक्ष केंदित केलं आहे, एवढं मात्र मी आता सांगू शकतो. शिवाय दहाही महापालिकांत मनसेचे प्रतिनिधी पाहायला मिळतील, हे नक्की.

. पण तुम्हाला आठ ते दहा जागा मिळाल्या आणि मदतीसाठी एखादी युती वा आघाडी तुमच्याकडे आल्यास तुम्ही काय कराल?

ु हा जर तरचा प्रश्न झाला.

. पण शिवसेना-भाजपला पाठिंबा?

ु नाही. त्या युतीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

. निवडणुकांचं वातावरण का नाही?

ु लोक सर्व पक्षांना कंटाळले आहेत. त्या पक्षांनी काही केलंच नाही. मुंबईचे प्रश्न पडूनच आहेत. म्हणून ते गप्प आहेत. पण असा सायलेंट व्होटरच चमत्कार करून दाखवणार आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल. मी लोकांना नवा नसलो, तरी माझा पक्ष नवखा आहे. हा पक्ष सांगतो, ते करून दाखवेल, असं वाटत असल्यामुळेच मनसेच्या आणि माझ्या सर्व सभांना प्रचंड गदीर् होत आहे. जी मंडळी एरवी मतदानासाठी बाहेर पडत नाहीत,ती माझ्या सभांना येत आहेत. सुशिक्षित, मध्यमवगीर्य, तरुण असेच सर्वच सभांना येत आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे.

. तुमच्या नगरसेवकांचे आधीच राजीनामे घेऊन ठेवण्याचं तुम्ही जाहीर केलं आहे. लोकशाहीमध्ये ही कृती कितपत योग्य आहे?

ु हो मी मनसेच्या नगरसेवकांचे राजीनामे घेऊन ठेवणारच. माझ्या नगरसेवकांनी पक्षशिस्त पाळायलाच हवी. लोकांची कामं करायलाच हवीत. ते त्यांनी केलं नाही, तर पक्ष बदनाम होईल. ते मला मान्य नाही. शिवाय माझ्या नावावर ते निवडून येणार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा मला अधिकार आहे. लोकशाही म्हणजे काही बेबंदशाही नव्हे.

. तुमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं कधी बोलणं होतं का?

ु हो. आम्ही फोनवर अधूनमधून बोलत असतो. कधी मी त्यांना चांगला विनोद ऐकवतो, कधी ते ऐकवतात. कधी त्यांच्या तब्येतीच्या गप्पा होतात.

. उद्धवशी?

ु नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकदाही नाही.

. तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलात. पण सेनच्या नेत्याशी तुमची बिझनेस पार्टनरशिप आहे..?

ु माझी बिझनेस पार्टनरशिप उन्मेष जोशीशी आहे आणि तो कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. आपण बिझनेस पाहत नाही, असं मनोहर जोशी यांनीच जाहीर केलं आहे. शिवाय शिवसेना सोडली म्हणून बिझनेस पार्टनरशिप सोडण्याचं काय कारण?

. तुमच्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक आहेत. त्यांचा निवडणुकीच्या राजकारणात कितपत उपयोग होतोय?

ु अहो, अतुल परचुरे, भरत जाधव सभा घेत आहेत. त्यांच्या सभांनाही गदीर् होतय. वीणा पाटील यांचीही भाषणं चांगली झाली. राघव नरसाळेसारखा अर्थतज्ज्ञही सभांमध्ये भाषण करतोय. अर्थात ते राजकारणाच्या प्रोसेसमध्ये आहेत. त्यांनी कधीच अशी भाषणं केली नाहीत. ती थोडीशी शाय आहेत. पण होतील तयार. तेच काय, मीही 'मीडिया शाय' आहे. बाकीचे राजकारणी मीडियाशी जसं वागतात, तसं मला जमत नाही.

. प्रत्यक्षात तुम्ही अॅरोगंट आहात, असं अनेकांना वाटतं..?

ु तसं असतं, तर इतके लोक माझ्या मागे आले असते का? हा आरोप २० वर्षांपूवीर् केला असता, तर समजू शकलं असतं. तेव्हा मी खूपच लहान होतो. तेव्हाचं माझं वागणं तसं असू शकेल. पण आता मला नाही वाटत की मी अॅरोगंट आहे.
 
posted by Rohit at 8:24 AM | Permalink |


0 Comments: