शिवसेनेचे उमेदवार कर्माने पडतील- शिशिर शिंदे ,उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Wednesday, January 31, 2007
तुमचे उमेदवार नवखे, अननुभवी आहेत. कुणालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेय...

राजीव गांधी राजकारणात आले तेव्हा तेही नवखेच होते. पण राजकारणात त्यांनी ठसा उमटवला. आम्ही तरूण उमेदवार दिलेत. राजकारणात तरूणांचा भरणा जास्त असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे.

' मनसे'ला पाया आहे का?

नक्कीच. राज ठाकरे यांचा करिष्मा आणि त्यांचा प्रामाणिकपणा हा पक्षाचा पाया आहे. लोकलला लटकून जाणाऱ्या सामान्य माणसांचा आमचा पक्ष आहे.

शिवसेनेकडे तुम्ही शत्रू म्हणून पाहता का?

कशाला पहायचे? ते पालिकेत सत्ताधारी आहेत. त्यांच्या आधी काँगेस पक्ष सत्तेवर होता. या सर्वार्नी सर्व काही उपभोगले आणि जनतेला भोगायला लावले. हे दोन्ही पक्ष आमचे राजकीय शत्रू आहेत. आमचा पक्ष 'अनटेस्टेड' आहे.

शिवसेनाविरोधी भूमिका घेऊन कायम राजकारण होणार का?

शिवसेनेची ही शेवटची निवडणूक आहे. त्यांच्या विरोधात बोलतो, कारण ते सत्ताधारी आहेत. त्यांनी जनतेचे वाटोळे केले. मंुबईतली मोकळी मैदाने-फूटपाथ विकले. अर्थसंकल्पातील ५० टक्के रक्कम त्यांना खर्चच करता आली आही आणि पुन्हा आणखी मदत मागताहेत. प्रशासनावर त्यांचा वचक नाही. त्यामुळे त्यांच्या धोरणाविरोधात बोलणे स्वाभाविकच आहे.

शिवसेनाप्रमुख बोलतात, तसेच राज ठाकरेही बोलतात...

राज यांनी कधीही लोकभावनेला हात घातलेला नाही. ते कायम विकासाचे आणि वास्तव बोलतात. शिवसेनेच्या राज्यात जास्त संख्येने मंदिरे तोडली गेली. तेव्हा त्यांना हिंदुत्वाची आठवण कुठे झाली?

शिवसेनेचे उमेदवार पाडण्यावर भर देणार?

त्यांचे उमेदवार त्यांच्या कर्मानेच पडणार आहेत. आमचे जास्त उमेदवार जिंकणार म्हणजे त्यांचे उमेदवार पडणारच.

तुमच्या उमेदवारांना आथिर्क पाठबळ आहे का?

बिनपैशाची निवडणूक लढवता येत नाही, हे खरे आहे. उमेदवार जमेल तसा खर्च करतात. ज्या जागा महत्त्वाच्या, जिथे निवडून येण्याची जास्त संधी आहे, त्याठिकाणच्या उमेदवारांना पक्षाकडून थोडी मदत दिली आहे.

काँग्रेसच्या मतांच्या विभागणीमुळे युती सत्तेवर येईल....

मतांची विभागणी झाली तरी युतीचा पराभवच होईल. कारण दहा वषेर् त्यांनी मंुबईचे काय धिंडवडे काढले, ते लोकांना माहीत आहे.

कुर्ला-भांडुप पट्ट्यात बंद पडणारे उद्योग आणि मॉलमध्ये मराठी तरूणांच्या नोकरीच्या मुद्यावर झालेल्या आंदोलनाचे पुढे काय झाले?

हो, तेव्हा शिवसेनेत असताना आम्ही आंदोलन आंदोलन पुकारले होते. मॉलमध्ये किमान ७०० तरूणांना काम मिळायला हवे होते. पण १०० जणांनाच मिळाले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा आंदोलन थांबवण्याचा आदेश दिला.

मराठी-अमराठी वादात कुणाला न दुखावण्याची पक्षाची भूमिका आहे का?

मराठी ही या राज्याची भाषा आहे आणि मराठी माणसाला इथे मान द्यायलाच हवा, ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका इतरांसारखी नाही. निवडणूक आली की इतरांना मराठीपण आठवते आणि इतरवेळी हिंदुत्व. अपयश झाकण्यासाठी ही मंडळी हे मुद्दे वापरतात.

मंुबईतल्या लोंढ्याविषयी भूमिका काय?

झोपड्यांचा पुनविर्कास झाला पाहिजे. कायदेशीर झोपडीधारकांना दजेर्दार राहणीमान उपलब्ध झाले पाहिजे. अनधिकृत झोपड्यांना, त्यांना पाणी आणि वीज पुरवठा करणाऱ्यांना चाप लावून. नवीन झोपड्या उभारण्यास मनाई केली पाहिजे. कुणालाही येऊन इथे घर बांधून आरामात राहणे आता शक्य नाही असे चित्र निर्माण होईल, तेव्हा इथे येणारे लोंढे आपोआप थांबतील.
 
posted by Rohit at 7:51 AM | Permalink |


0 Comments: