सर्व काही वेल प्लॅन्ड!
Monday, January 29, 2007
शिवाजी पार्कमध्ये सभा घेणाऱ्यांना नेमकी किती गर्दी जमेल, याची भीती नेहमीच वाटत असते. याच भीतीपोटी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना करताना मैदानामधोमध स्टेज उभारले होते. मात्र राज यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्याची काळजी घेतानाच इव्हेन्ट मॅनेजमेंटवाल्यांनी चोख नियोजन केले होते. शिवाजी पार्क जिमखान्याच्या गच्चीतील गर्दी एखादी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीलाही मागे टाकणारी होती.

स्टेजवर शिशिर शिंदे, माजी आमदार दीपक पायगुडे, शिरीष पारकर, दिगंबर कांडरकर, अतुल सरपोतदार, शिरीष सावंत, वसंत गीते, श्वेता परुळेकर तसेच प्रवीण दरेकर या मोजक्याच नेत्यांची लगबग सुरू होती. राज येण्यापूवीर् दीपक पायगुडे यांनी भाषण केले. या भाषणाला बरीच दाद मिळाली. राज यांच्या आगमनानंतर शिशिर शिंदे यांनी भाषण केले. मात्र ते वाचून दाखवल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

राज यांचे आगमन होताच नाशिक बाजा आणि आतषबाजीचा धडाका सुरू झाला. याप्रसंगी राज यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला घातलेला हार अनेकांच्या चचेर्चा विषय ठरला. अतिशय साध्या पद्धतीने आगमन झालेल्या राज यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा शिवाजी पार्कमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. मैदानात लावलेल्या प्रचंड आकाराच्या स्क्रिनवरून स्टेजवरच्या हालचाली प्रत्येकजण डोळ्यात साठवत होता. पाणावल्या डोळ्यांनी गदीर्कडे पाहताना भारावलेला राज हा सभेचा सर्वात हृद्य क्षण होता.
 
posted by Rohit at 3:31 AM | Permalink |


0 Comments: