विक्रमी सभेनंतर सदस्यनोंदणीचा धडाका
Monday, January 29, 2007
निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा झेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवण्याची इच्छा बाळगून राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्व नोंदणीला महावीर जयंती आणि ईद ए मिलादचा मुहूर्त साधून राज्यभरात 11 एप्रिलपासून मोठ्या धडाक्यात सुरुवात होणार आहे. राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या सदस्य नोंदणीचे रेकॉर्ड मोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ मुंबईतच साडेपाच लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदवण्याचे उद्दिष्ट दिले असून बोगस फॉर्म शोधण्यासाठी नवनिर्माण सेनेची स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे.

नवनिर्माण सेनेची शिवाजी पार्कमध्ये विक्रमी सभा आयोजित करून राज ठाकरे यांनी शिवसेनेसह महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला होता. आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या नोंदणीमध्येही हेच धक्कातंत्र अवलंबण्यात येणार आहे. अकरा तारखेला मोहिमेचे उद्घाटन करण्यापूवीर् नऊ एप्रिलला वांदे येथील रंगशारदा सभागृहात मोहिमेची माहिती देण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. या सभेत सदस्य नोंदणीचे फॉर्म आणि पावती बुक वितरित केले जातील. 11 तारखेपासून 30 तारखेपर्यंत राज्यभरात ही मोहीम राबवण्यात येईल. प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. प्रत्येक फॉर्मवर बार कोड, नवनिर्माण सेनेचा होलोग्राम असेल, फॉर्मच्या झेरॉक्स कॉपी चालणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमधील 50 कार्यर्कत्यांवर किमान 40 सदस्य नोंदविण्याचे उदिष्ट सोपवले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसलेल्या तरुणांना पक्षाचे सदस्य करून घेण्याला प्रधान्य दिले जाणार आहे. फॉर्ममध्ये सदस्याच्या कौटुंबिक माहितीसह कोणत्या क्षेत्रात काम करतो, त्याचाही तपशील नोंदवून घेतला जाईल.

मुंबईत 227 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात दोन हजार फॉर्म असे गृहित धरून साडेचार लाखांपेक्षा अधिक सदस्य केवळ मुंबईतच पहिल्या टप्प्यात नोंदविले जातील, असा अंदाज एका कार्यर्कत्याने व्यक्त केला. अनेक राजकीय पक्षांत सदस्य नोंदणीचा आकडा फुगवण्यासाठी बोगस सदस्य नोंदविले जातात. पण नवनिर्माण सेनेत बोगस सदस्य नोंदणी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबीच ठाकरे यांनी कार्यर्कत्यांना दिली आहे.
 
posted by Rohit at 3:48 AM | Permalink |


0 Comments: