महाराष्ट्र 'नऊ'निर्माण सेना?
Wednesday, January 31, 2007
राज ठाकरे यांचे नऊ आकड्यावरचे प्रेम पक्ष स्थापनेपासूनच लपून राहिलेले नाही. आताही महापालिका निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून राज यांनी नऊचा एकही मुहूर्त वाया जाऊ दिला नाही. जाहीरनाम्याचे प्रकाशनही नऊचा मुहूर्त साधूनच झाले. ९ आणि ज्यांची बेरीज ९ येते अशा १८ आणि २७ या तारखा संख्याशास्त्राच्या दृष्टीने ९च. त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीच्या अशा ९ च्या पाचही दिवशी राज यांनी प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत.

शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याचा वाढदिवस त्यांनी १८ डिसेंबरला साजरा केला तो सेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे चिंचपोकळीत झालेल्या सभेने. राज यांच्या लाडक्या नाशकात प्रचाराचा नारळ फोडला तो २७ डिसेंबरच्या गोल्फ क्लब येथील भव्य सभेने. एवढेच नाही तर मुंबईतला प्रचाराचा नारळही गोरेगाव येथील एनएससी मैदानात दमदार मेळावा घेऊन नऊ जानेवारीच्या मुहुर्तावर. २७ जानेवारीला जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. १८ जानेवारी त्यांनी आतापर्यंतच्या घटनांच्या तुलनेत कमी महत्त्वाचा पण तरीही विदर्भातील सर्वाधिक महत्त्वाचा नागपुरचा मेळावा केला.

नवाचे हे प्रेम फक्त तारखांपुरते मर्यादित नाही. २२७ मतदारसंघ असूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २२५ उमेदवारी अर्ज भरले. एका ठिकाणी पैशाचे व्यवहार झाल्याने आणि दुसरीकडे जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने दोन वॉर्डात अर्ज भरण्यात आले नाहीत. २२५ मधील आकड्यांची बेरीज ९ होते. शिवाय नऊची हवा राज यांच्या पाठीराख्यांमध्येही पसरली आहे. २००७ च्या अंकांची बेरीज ९ येते, त्यामुळे यावषीर् आपण चांगली कामगिरी करणार असा त्यांना भरवसा वाटतो आहे.
 
posted by Rohit at 8:09 AM | Permalink |


0 Comments: