राज यांचा 'शद्ब' इतरांसारखा नि वेगळा...
Wednesday, January 31, 2007
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्याऐवजी राज ठाकरे यांनी प्रसृत केलेल्या 'माझा शद्ब' मध्ये अन्य पक्षांसारखेच अनेक मुद्दे आहेत; मात्र, वेगळेपणा दाखवून देणारीही काही आश्वासने यात आहेत.
जलवाहिन्यांच्या भोवती असलेल्या अनधिकृत झोपड्या काढणे, उपनगरांत पाच ट्रॉमाकेअर सेन्टर्स, महिलांसाठीची खास प्राथमिक आरोग्य केंद, पुढील ५० वर्षांचा विचार करून मलनिस्सारण आणि पर्जन्यवाहिन्यांचे नियोजन, पालिकेच्या दहा शाळा आणि शंभर खेळाडू दत्तक घेणे, मालमत्ता करासाठी रेडी रेकनर हा पाया धरून पुढच्या दहा वर्षांत प्रॉपटीर् टॅक्स वाढणार नाही आणि दर सहा महिन्यांनी पालिकेतील पैशाचा ताळेबंद लोकांना सादर करणे, असे थोडे हटके मुद्दे 'माझा शब्द' मध्ये आहेत.

स्मशानात गेल्यावर पुढची व्यवस्था मोफत करण्यापेक्षा स्मशानात जाण्याची कमीत कमी वेळ यावी, यासाठी आपला जाहीरनामा असल्याचा दावा त्यांनी केला. तरीही जाहीरनाम्यात पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करणे, डास निर्मूलन मोहीम, राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जा, आपत्कालीन व्यवस्थांचे आधुनिकीकरण, कचरामुक्त मुंबई, झोपडपट्ट्यांत शौचालये, भूखंडांचे आरक्षण कायम ठेवणे, कारभाराचे संगणकीकरण, गावठाणांचा विकास अशी अन्य पक्षांनी दिलेली अनेक आश्वासने यातही आहेत.

...................................................................................................................

प्रॉपटीर् टॅक्स न वाढवण्याची हमी

नागरिकांना जमाखर्च दाखवणार

५० वर्षांचे पाणी-ड्रेनेज नियोजन
 
posted by Rohit at 8:19 AM | Permalink |


0 Comments: