मनसेचा हायटेक प्रचार
Wednesday, January 31, 2007
कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपला प्रचार करण्यासाठी निवडणुकीतील प्रत्येक उमेदवार काही ना काही युक्त्या शोधून काढत असतो. त्यात मतदारांना उमेदवाराचं नाव व त्याची निशाणी छापलेली असते, अशा छापील स्लीप देण्याचा कल जरा जास्तच असतो. मात्र या गोष्टीसाठी जास्त वेळ वाया जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वैभवी चव्हाण यांनी नवं तंत्र अवलंबल आहे. मतदारांना ही स्लीप देण्यासाठी 'लॅपटॉप'चा वापर त्या करत आहेत.

वॉर्ड क्रमांक ५७ मधून वैभवी चव्हाण मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. बीएस्सी, बीएड करून शिक्षकी पेशा पत्करलेल्या वैभवी यांनी समाजासाठी आवश्यक त्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्यात त्यासाठीच राजकारण प्रवेश केल्याचं त्या सांगतात.

गटार, नाले, रस्ते यातच गुंतून न राहता आपल्या वॉर्डमधील आणि शहराच्या जवळपासच्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ विजेची सोय असणारी अभ्यासिका व ग्रंथालय त्यासाठी सौरऊजेर्चा जास्तीत जास्त वापर करणं, आजी, आजोबांसाठी पार्क, करिअर गाइडलाइन सेंटर, विशेष स्वच्छता प्रोग्राम राबवण्याचा मनोदय व्यक्त करताना आपण शिक्षक असल्याने खोटी वचनं देत नाही, हे सांगण्यास वैभवी चव्हाण विसरत नाहीत.

वॉर्डातील साधारण पाच हजार मतदारांची नाव लॅपटॉपमध्ये समाविष्ट केली. त्यामुळे डोअर टू डोअर प्रचार करताना त्याच वेळेस मतदाराचं नाव विचारून त्याला मतदानाची स्लीप ताबडतोब देता येते. त्यासाठी यादी शोधण्यात वेळ घालवण्याची गरज नाही. त्यामुळे मतदारांचाही विश्वास वाढतो व जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो, असं वैभवी चव्हाण यांनी सांगितलं.

शिवसेना, काँग्रेस व गंगाजल फ्रण्टचे उमेदवार माझ्या विरोधात उभे असले तरी मी यातील कुणालाही प्रतिस्पधीर्र् मानत नाही, असंही त्या सांगतात.
 
posted by Rohit at 7:48 AM | Permalink |


0 Comments: