मूलभूत प्रश्न 46 वर्षे का सोडवले नाहीत? ; राज ठाकरे.
Monday, January 29, 2007
महाराष्ट्रस्थापनेला 46 वषेर् झाल्यानंतरही नेते वीज-पाणी-रस्ते-नोकऱ्या याच चार प्रश्नांवर निवडणुका लढतात, हे प्रश्न सोडवण्याची आश्वासने देतात, ही शरमेची गोष्ट आहे, असे ठणकावत राज यांनी राज्यर्कत्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना धारेवर धरले.

रेताड, उजाड महाराष्ट्रात आमदार-मंत्र्यांच्याच जमिनी हिरव्यागार असतात, इतर प्रांतांना पाणी मिळू द्यायचे नाही, ते मोठे होऊ नयेत म्हणून झटायचे, ही कसली विकृती, असा संतप्त सवाल राज यांनी केला. या भिकार राजकारण्यांनी नासवण्यासाठी नव्या पिढ्या जन्माला येतात काय, असा प्रश्न विचारून राज म्हणाले की आपल्या राज्यात माणसे जन्मतात, तरुण होतात, म्हातारी होतात आणि मरून जातात. नोकऱ्या-शिक्षणाचे सुख काही मोजक्यांनाच लाभते. आज राज्यात मिळणारे शिक्षण हे 'एक्स्पायरी डेट उलटून गेलेले' शिक्षण आहे, अशी टीका करीत राज यांनी सगळ्या 'शिक्षणसम्राटां'ची संभावना 'बेरोजगारीचे काखानदार' अशा शब्दांत केली.

सामान्य करदाता सरकारला कर भरतो, तेव्हा तो सरकारशी केलेला करार असतो... त्या कराराचे पालन सरकारी यंत्रणा करते की नाही, यासाठी आपला पक्ष सरकारला जाब विचारेल, सरकारी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरेल, असे आश्वासन राज यांनी दिले. मुंबईतील पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षपणे फोडत राज यांनी मुंबईतला एकही आरक्षित भूखंड विकू दिला जाणार नाही, असा इशाराही देऊन टाकला. पालिकेच्या कंत्राटदारांवरही 'नजर' ठेवली जाईल आणि त्यांच्या कामाचा जाब विचारला जाईल, असे ते म्हणाले.

आपल्या पक्षाचा झेंडा घेतलेल्या युवकांच्या आईवडिलांना, आपला मुलगा वाया गेला, असे वाटणार नाही; त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान असेल, असा दिलासाही राज यांनी दिला आणि महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला साथ द्या, असे आवाहन केले
 
posted by Rohit at 3:31 AM | Permalink |


0 Comments: